¡Sorpréndeme!

पर्यटकांना ताजमहालपर्यंत कारने नव्हे चालतच येऊ द्या : सुप्रीम कोर्ट | Taj Mahal Latest News

2021-09-13 0 Dailymotion

ताजमहालजवळ बहुमजली पार्किगला परवानगी नाकारतानाच सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. पर्यटकांना ताजमहालपर्यंत कारने नव्हे चालतच येऊ द्या, असे कोर्टाने म्हटले आहे. ताजमहाल जवळील पार्किंगबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने बहुमजली मोटार पार्किग पाडून टाकण्याचा आदेश दिला होता. हे पार्किंग ताजमहालच्या पूर्व दरवाजापासून 1 कि.मी. अंतरावर होते. याबाबत पुनर्विचार याचिका दाखल झाल्यावर बहुस्तरीय मोटार पार्किंग पाडून टाकण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. ताज ट्रॅपिझियम झोन व आजूबाजूच्या भागांच्या संरक्षणाबाबतचे सर्वसमावेशक धोरण नेमके काय आहे ते उत्तर प्रदेश सरकारने सांगावे, असे निर्देशही दिले होते. सुप्रीम कोर्टाने बहुमजली पार्किंगला परवानगी नाकारतानाच उत्तर प्रदेश सरकारला फटकारले. ताजमहालच्या रक्षणासाठी आराखडा तयार न केल्याने कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला खडे बोलही सुनावले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews